Sanjay Gaikwad : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर राज्यातील इतर भागातून अशाच प्रकराची प्रकरणं पुढे येईल लागली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या, अशी मागणी पुढे येईल लागली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

बदलापूर प्रकरण आणि विरोधकांच्या आरोपांवर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनीही भाष्य केलं आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. मुंबई तक या वृत्तावाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

हेही वाचा – “आता तिथे १०० फूटांचा पुतळा…”, २८ फुटांचा पुतळा कोसळल्यानंतर दीपक केसरकर यांचे विधान

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

“बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.

“विरोधक कुठलीही घटनेचं राजकारण करतात”

“मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात, त्या हाताळ्यासाठी एक व्यवस्था असते, राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Statue Collapse : “पंतप्रधान हात लावतात तिथे माती होते”, पुतळा कोसळल्यावरून संजय राऊतांची टीका; म्हणाले, “शिंदेंनी मर्जीतल्या…”

बदलापूरची घटना काय?

काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचा केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरमधील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, या घटनेतील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.

Story img Loader