Sanjay Rathod Car Accident News: यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाला तेव्हा संजय राठोड त्यांच्या कारमध्ये नव्हते. ते दुसऱ्या एका कारमधून मागून येत होते. त्यांची कार पुढे निघाली होती. हा अपघात यवतमाळमधील कोपरा या गावात गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्यात कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये संजय राठोड यांच्या कारचा चालक एअरबॅग्जमुळे बचावला आहे.

कसा झाला अपघात?

कोपरा गावाजवळून कार जात असताना ही दुर्घटना घडली. कारने समोरच्या पिकअप व्हॅनला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. रस्त्यावरून दोन्ही गाड्या वेगाने जात असताना पिकअप व्हॅननं अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून कारची जोरात धडक बसली. या अपघातात पिकअप व्हॅन पलटी झाली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला असून अपघातानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”

संजय राठोड थोडक्यात बचावले

संजय राठोड त्यांच्या कारमधूनच प्रवास करणार होते. मात्र, ऐनवेळी नियोजन बदलल्यामुळे ते दुसऱ्या एका पाहुण्यांच्या कारमधून निघाले. त्यांची कार पुढे निघाली. अपघात घडल्यानंतर जवळपास १५ ते २० मिनिटांनी संजय राठोड प्रवास करत असलेली कार त्या ठिकाणी पोहोचली. त्यामुळे कार बदलल्यामुळे संजय राठोड थोडक्यात बचावले.

संजय राठोड ३ ऑक्टोबर रोजी यवतमाळहून वाशिममधील पोहरादेवी येथे दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पोहरा देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी संजय राठोड पोहरादेवीहून परत येत असताना हा अपघात घडला.

Story img Loader