Sanjay Raut vs Medha Somaiya Defamation Case : भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्तींनी राऊतांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड ठोठावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच त्यांना १५ दिवसांची शिक्षा ठोठावली आहे. मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असं राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला. या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा यांची तक्रार योग्य ठरवली. तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे

मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी माझगाव न्यायालयात खटला चालवण्यात आला जो मेधा यांनी जिंकला असून न्यायालयाने संजय राऊत यांना शिक्षा सुनावली आहे.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

हे ही वाचा >> रस्त्यात साचलेलं पाणी पाहून अमित शाहांच्या ताफ्यानं वाट बदलली; काँग्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, “गडकरी, शिंदेंचा विकास पाहून…”

भाजपाची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, यावर आता भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बावनकुळे म्हणाले, न्यायालयाचा निर्णय सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यानुसारच पुढे गेलं पाहिजे. तसेच संजय राऊत यांनी आता अशाच चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. इतरांनीही याबाबत काळजी घ्यायला हवी.