Sanjay Raut vs Medha Somaiya Defamation Case : भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्तींनी राऊतांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड ठोठावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच त्यांना १५ दिवसांची शिक्षा ठोठावली आहे. मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असं राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला. या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा यांची तक्रार योग्य ठरवली. तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे
Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले “त्यांनी आता…”
Sanjay Raut Defamation Case : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2024 at 13:24 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकिरीट सोमय्याKirit Somaiyaचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar Bawankuleभारतीय जनता पार्टीBJPसंजय राऊतSanjay Raut
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut 15 days imprisonment defamation case kirit somaiya wife bjp reacts asc