गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला.

संजय राऊतांच्या या आरोपानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत हे खरे शिवसैनिक नाहीत. पण उसणं अवसान आणून आपणच शिवसेना वाचवत आहात, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला फसवत आहात, अशी टीका रामदास कदमांनी केली. तसेच संजय राऊतांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत, असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Haryana BJP chief Mohan Lal Badoli and Jai Bhagwan
Mohan Lal Badoli: भाजपाच्या नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडित तरुणीने सांगितली अत्याचाराची आपबिती

हेही वाचा- “होय, मी बीफ खातो, याला कोणीही रोखू शकत नाही”, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान!

संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना कशा पद्धतीने अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या,याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. राऊतांवर टीका करताना रामदास कदम म्हणाले, “संजय राऊतांना मी एवढंच सांगेन की, मी कालपर्यंत गप्प बसलो होतो. मी संजय राऊतांवर कधीही टीका केली नव्हती. पण आता पाणी डोक्यावरून जात आहे. संजय राऊत आपण विसरला असाल, पण मी विसरलो नाही.”

हेही वाचा- “भावी मुख्यमंत्री म्हणून फक्त रोहित पवार…”, ‘त्या’ प्रकरणावरून मनसे नेत्याची टोलेबाजी!

“ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केली. तेव्हा तुम्ही माझ्यासमोर दोघांना अश्लील भाषेत किती शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना दोघांनाही शिव्या घातल्या होत्या. कदाचित तुम्ही हे विसरले असाल पण मी विसरलो नाही. आपल्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. आपण मुळात शिवसैनिकच नाहीत. ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. पण उसणं अवसान आणून जणू शिवसेना तुम्हीच वाचवत आहात, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आपण फसवत आहात,” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.

Story img Loader