उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते मागील तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्याआधी ते फोर्टीज रुग्णालयात वेगवेगळ्या तपासण्यांसाठी जाणार आहेत.
हेही वाचा >>> “औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी उद्ध्वस्त कराव्यात, अन्यथा…” हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा
संजय राऊत आज अगोदर फोर्टीज रुग्णालयात जाणार आहेत. येथे ते आरोग्य तपासण्या करणार आहेत. तसेच डॉक्टरांचा सल्लादेखील घेतील. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री या ठिकाणी भेट घेण्यासाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटींमध्य आगामी राजकीय रणनीतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, तुरुंगाती बाहेर आल्यानंर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशाच्या राजकारणात संजय राऊतांना अटक करण्याची सर्वात मोठी चूक करण्यात आली आहे. मी तुरुंगात १०३ दिवस तुरुंगात होतो. आता १०३ आमदार निवडून आणणार, असे संजय राऊत म्हणाले.