भारतीय महसूल सेवा ( आयएरएस ) अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य चौघांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याच्या अटकेआधी २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ‘सीबीआय’ने मुंबईसह २९ ठिकाणी छापे टाकल्याचं सांगितलं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“समीर वानखेडे हे आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन आले आहेत. भाजपात ते प्रवेश करणार होते. भाजपा त्यांच्या समर्थनार्थ ‘We Support Sameer Wankhede’ असे फलक घेऊन रस्त्यावर उतरली होती. त्याप्रकरणात नवाब मलिकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं. पण, आज सत्य काय समोर आलं आहे. ‘सीबीआय’ने वानखेडेंवरती गुन्हा दाखल केला असून, अटक होऊ शकते. कदाचीत ईडीकडूनही वानखेडेंची चौकशी होऊ शकते,” असा दावा संजय राऊतांनी केला.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”

हेही वाचा : “कर्नाटकातील निकालांचा महाराष्ट्रावर परिणाम असा की..”, सुषमा अंधारेंची खोचक प्रतिक्रिया; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!

“भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात एनबीसीतील चोरमंडळाच्या बैठका”

“राजकारण किंवा प्रशासनातील चोर आणि लफग्यांना भाजपा समर्थन देते. आता भाजपाचं काय मत आहे? वानखेडेंना बढती मिळावी यासाठी मुंबई भाजपातील एक स्वयंघोषित नेता दिल्लीत वशिला लावत होता. भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात एनबीसीतील चोरमंडळाच्या बैठका होत होत्या. सगळी खंडणी तिथे गोळा होत असायची. हे खरं आहे की नाही, हे भाजपाच्या नेत्यांने सांगावं,” असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.

हेही वाचा : “राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षांसारखं वागावं, ते जर…”, संजय राऊतांनी ठणकावलं

“नवाब मलिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं”

“तुम्ही देशाला कुठे घेऊन जात आहात. खुनी-दरोडेखोर आणि खंडणीखोर अशा प्रशासनातील अधिकाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचत होता. नवाब मलिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. याचा अर्थ नवाब मलिकांवरील सर्व आरोप खोटे आहे. हे आज समजतंय,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Story img Loader