Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला. भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे. आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. दिल्लीत दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही. दिल्लीची सत्ता ले. गव्हर्नर आणि अमित शाह यांच्या तसंच मोदींच्या हाती आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपसातले मतभेद विसरुन एकत्र येणं गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही-राऊत

मला आश्चर्य वाटतं आहे लोकसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते. आमच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आले होते. दिल्लीत काँग्रेस पक्षाने केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या गोष्टीला शिवसेनेचं समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहिलं पाहिजे. टीका वगैरे होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो. पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणं योग्य नाही. असंही राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांच्याबाबतही भाष्य केलं.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!

हे पण वाचा- Dhananjay Munde Meet Ajit Pawar: बीड हत्या प्रकरणं तापलं, धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट

धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?

“आम्हाला पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावा नाही वगैरे काहीही अजित पवार बोलले नाही. आम्हाला गाडायचं आणि आता धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पुरावा शोधायचा, बीडमध्ये खेळ चालला आहे लोकांना फसवण्याचा. ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस आणि राजकारणी यांचे फोटो समोर येत आहेत. बीडच्या संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स चालला आहे. देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं पोलीस खातं बरखास्त करा आणि संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेर चालवा. एसआयटीमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो आरोपीशी संबंधित आहे की नाही?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी संविधानातला एव्हिडन्स अॅक्ट बदलला का?

अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स अॅक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे अॅक्सिडेंटल नेते आहेत. ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळाल्या आहेत. अजित पवार जर नेते असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलायला हवं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास ही धूळफेक आहे, आत्तापर्यंत वाचवण्याचेच प्रकार सुरु आहेत. सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात. सुरेश धस यांनी महाराष्ट्राला बीड पॅटर्न नावाचा कलंक लागतो आहे तो पुसण्यासाठी सामान्य माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader