Sanjay Raut : राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या एक्झिट पोल्सवर विश्वास नसल्याचं म्हटलंय. तसंच, राज्यात महाविकास आघाडीच्या १६० जागा निवडून येतील, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.

आम्ही २६ तारखेला सरकार स्थापन करतोय

संजय राऊत म्हणाले, “लोकसभेला मविआला १० जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला ३१ जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. १६० जागा आम्ही सहज जिंकतोय. हे (एक्झिट पोल) सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल. आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही.

Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mahavikas Aghadi :
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : “शिंदे-फडणवीसांकडून अपक्षांना ५० ते १०० कोटींची ऑफर”, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा दावा
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

“सरकार अधिक मजबूत करायचं असेल तिथे लहान पक्ष आणि अपक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार वर्गाचे नेते, समाजवादी, डावे पक्षाचे आमदार येतील. अपक्ष उमेदवारांनीही पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

अपक्षांना ५० ते १०० कोटींची ऑफर

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उशाला नोटांची बंडले घेऊन झोपतात. त्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. गादीतही पैसे टाकून ठेवतात. त्यांनी अपक्षांना ५० ते १०० कोटी ऑफर द्यायला सुरुवात केलीय. याचा अर्थ आम्ही जिंकतोय. हे तुमच्या सर्वेवाल्यांना सांगा. त्यांना जिंकण्याची एवढी अपेक्षा असती तर त्यांनी आतापासून थैल्या पाठवल्या नसत्या लहान पक्ष आणि अपक्षांना”, असंही ते म्हणाले,

“मतदानात अचानक वाढ होते, कुठे चार टक्के वाढतात तर हरियाणात सहा टक्के वाढ. लोकसभेलाही मतदानात वाढ झाली. हा खेळ काय आहे, याबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावं. दोन चार टक्क्यांच्या आधारावर भाजपाचा जागा कशा वाढतात? हा खेळ आहे. याबाबत महाराष्ट्राला सांगावं”, असंही ते म्हणाले.

आंबेडकर मविआबरोबर येतील

“प्रकाश आंबेडकर हे लोकशाहीला मानणारे नेते आहेत. त्यांचे ५० -६० आमदार निवडून आले आणि आम्हाला त्यांची गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांचा पाठिंबा घेऊ. महाराष्ट्रातील ते महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही नक्की त्यांचा विचार करू. लोकसभेलाही आम्ही प्रयत्न केला. विधानसभेसाठीही प्रयत्न केला. आमची सत्ता येतेय, त्यामुळे आंबेडकर आमच्याबरोबर येतील”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आम्ही सर्व अडथळे पार करू

“भाजपाचा हा डाव आहे. त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला आहे. उद्या निकाल लागेल. २४-२५ तारखेला आमदार मुंबईत पोहोचतील, तिन्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवले जातील. सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. राज्यात राजभवनाच्या शाखाच्या आहेत. कारभार भाजपाचा असल्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते अडथळे आणतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही”, असंही ते म्हणाले.

आम्ही असं ठरवलंय की आमच्या आमदारांना मुंबईत आणणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील नवीन आमदारांचे मुंबईत निवासस्थान नाही. ग्रामीण भागातून नवीन आमदार मुंबईत राहणार कुठे? त्यांच्या निवासस्थानाबाबत कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.