रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वारिशे यांचा अपघाती मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झालेली असली तरी तपास प्रामाणिकपणे केला जाईल, याबाबत मी साशंक आहे, असे राऊत म्हणाले. सोबतच मलादेखील तुरुंगात जवळजवळ मारण्याचा प्रयत्न करण्यात होता, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा >>> पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “एकाच वेळी सगळे…

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
Sanjay raut on balasaheb thackeray
Sanjay Raut : “…तर वीर सावरकरांचाही गौरव ठरेल”, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून संजय राऊतांचं विधान चर्चेत!
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Sanjay Raut
Sanjay Raut : “उठाव कसा करायचा हे आमच्याकडून शिका”, शिवसेनेच्या मंत्र्याचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

तुम्ही असे किती खून करणार आहात?

“नाणार प्रकल्पाचा मुद्दा हा विकासाचा आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय स्थानिक लोकांनी घ्यायचा आहे. मला या संदर्भात दोन्ही बाजूचे लोक भेटतात. शशिकांत वारिशे यांची राजकीय हत्या आहे. राज्यातील सरकार बदलल्यानंतर आता कोण आडवे येते ते पाहा, असे ते सांगत आहेत. मग आडवे येणाऱ्यांचे खून करायचे का? तुम्ही असे किती खून करणार आहात? किती खून पचवणार आहात? ” असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा >>> “अदाणी प्रकरणामुळे भारताच्या विश्वासहार्तेला तडा, मोदींना उत्तर द्यावेच लागेल”, अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची प्रतिक्रिया

मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता

“माझ्यासारख्या माणसाला तुरुंगात पाठवलं. मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता. याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मी यावर योग्य वेळी बोलणार आहे,” असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले. तसेच “तुम्हाला माणासं संपवण्यासाठी सत्तेवर आणले आहे का? शशिकांत वारिशे यांनी तुमचे काय वाकडे केले होते? वारिशे यांच्या आईचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, येथील पालकमंत्र्यांनी पाहावा. हे महाराष्ट्रात चालणार नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader