महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रातील जनता गेल्या तीन वर्षांपासून मोठा राजकीय सत्तासंघर्ष पाहतेय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या. महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आणि चार वेगवेगळे गट तयार झाले. या गटांमध्ये टोकाचा संघर्ष चालू आहे. अशातच या गटांनी अनेक लहान-मोठ्या पक्षांबरोबर तडजोडी केल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चादेखील झाली. परंतु, हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “मनसेला आमच्याबरोबर घेण्याबाबत आमच्या पक्षात कधीच चर्चा झाली नाही. ज्यांनी असा विषय यापूर्वी काढला होता, तेच शिवसेना सोडून गेले”. संजय राऊत एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या राजकीय मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, गेल्या काही वर्षांमध्ये शिवसेनेनं (ठाकरे गट) किंवा महाविकास आघाडीनं अनेक नवनवे मित्र आणि वेगवगळे पक्ष आपल्याबरोबर जोडून घेतले. उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर घरोबा केला. परंतु, या काळात कधी राज ठाकरे यांना आपल्याबरोबर घेण्याचा विचार आला नाही का? यावर संजय राऊत म्हणाले, आमच्या पक्षात यावर कधीच चर्चा झाली नाही. काही लोकांनी याबाबत विषय काढला असेल. परंतु, ते लोकच पक्ष सोडून गेले.

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

संजय राऊत यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्हाला आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची काही शक्यता दिसतेय का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ते दोघे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) भाऊ आहेत. हे दोन्ही भाऊ एकत्रच आहेत. कुटुंब म्हणून ते एकत्रच आहेत. फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. कुटुंब कायम राहतं, नाती टिकवली जातात, कुटुंब म्हणून दोघेही एकत्रच आहेत. त्यांचे चांगले संबंध आहेत आणि आम्हीदेखील (शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक) दोघांशी चांगले संबंध ठेवतो. त्यात काहीच गैर नाही. महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार तर नक्कीच आहे.

हे ही वाचा >> सांगली लोकसभेवरून मविआत तिढा? ठाकरे गट चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार? संजय राऊत म्हणाले…

उद्धव ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप कुठल्याही पक्षाशी युती केलेली नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी राज ठाकरे यांना दिल्लीत भेटीसाठी बोलावलं होतं. या भेटीनंतर भाजपा-मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Story img Loader