छत्तीसगडमध्ये हसदेव जंगलातील झाडांची कत्तल सुरू असून ९३ हजार हेक्टरवरील १० हजार झाडांचं अदाणी यांच्या उद्योगासाठी बलिदान देण्यात येणार आहे. त्याविरोधात आदिवासींनी आंदोलन सुरू केलं आहे. कोळशाच्या उत्पादनासाठी आदिवासीचं जंगलं नष्ट करणं, हा पर्यावरणाचा मुडदा पाडण्याचा प्रकार आहे, अशी टीका ठाकरे गटानं ‘सामना’ अग्रलेखातून केली होती. हाच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. “एकदिवशी अयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत म्हणाले, “छत्तीसगडचे जंगल तरी राहून द्यावं. प्रभू श्री राम जंगलात वनवास भोगल्यानंतर अयोध्येत माघारी परतले. जंगलात प्रभू श्री राम आणि बाकीच्या देवांनीही वास्तव केलं आहे. पण, आता जंगल तोडून एखाद्या उद्योगपतीला देण्याचा घाट घातला जातोय. त्याविरोधात छत्तीसगडचे आदिवासी संघर्ष करत असून त्यांना तुरुंगात टाकलं जातंय.”

“प्रत्येक कामात व्यापार आणि व्यवहार आहे”

“देशात सगळं एकाच व्यक्तीला दिलं जात आहे. एकदिवशी अयोध्येचा सातबाराही एखाद्या उद्योगपतीला दिला जाईल. प्रत्येक कामात व्यापार आणि व्यवहार आहे,” अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली आहे.

“अयोध्येच्या संघर्षात योगदान नसलेले सगळ्यात पुढे”

“आमंत्रणाचं राजकारण देशात कधीही झालं नव्हतं. संसदेचं उद्घाटन झाल्यावरही हाच प्रकार झाला. आता राम मंदिराच्याबाबतही हेच सुरू आहे. हे सगळे सोहळे एका पक्षाचे आहेत. या सोहळ्यांना राष्ट्रीय स्वरूप नाही. देशाच्या स्वातंत्रलढ्यात कवडीभर योगदान नसलेले उद्घाटन करतात. अयोध्येच्या संघर्षात योगदान नसलेले सगळ्यात पुढे आहेत,” असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला आहे.