काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले होते. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते,’ असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत हटवण्याची मागणी केली आहे. यावरूनच शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गप्प का?’, असा सवाल विचारला आहे.

Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध

हेही वाचा : “वारंवार लोकांच्या श्रद्धेला…,” सावरकरांवरील टीकेनंतर संजय राऊतांची राहुल गांधींना विचारणा, म्हणाले “अशाने भारत कसा जोडणार?”

संजय राऊत यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलं की, “महाराष्ट्राचा स्वाभिमान वगैरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली. एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपाचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा : राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.