२०१९ नंतर महाराष्ट्रात २०२२ मध्ये मोठं सत्तांतर घडलं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोर केली. यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर, राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार आलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा सांगितला. अशातच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. पण, यावर एक आठवड्यांनी सुनावणी पार पडणार आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केला आहे.

congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

हेही वाचा : “नारायणरावांची बारकी-बारकी लेकरं…”, नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानावर सुषमा अंधारेंची तुफान टोलेबाजी!

संजय राऊत कोल्हापुरात शिवसैनिकांना संबोधित करत होते. तेव्हा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल, हे सोडून द्या. जनता काय निकाल देईल, हे महत्वाचं आहे. २०२४ साली आमची सत्ता येऊद्या, आज ज्याने निकाल दिला आहे, नाही त्याला चुना मळायला पाठवलं तर बघा, असं टीकास्त्र संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर सोडलं आहे.

हेही वाचा : “चोरांच्या हाती संसदीय लोकशाहीची सूत्रं असू नयेत म्हणूनच मी चोरमंडळ…” काय म्हणाले संजय राऊत?

“गद्दारांच्या अंत्ययात्रा निघणार”

“येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवून गद्दारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, अशी लोकगर्जना चांद्यापासून बांद्यापर्यंत झाली पाहिजेत. २०२४ ला सर्वांचा हिशोब चुकता करू. गद्दारांनी आम्हाला धडे देऊ नयेत. येणाऱ्या काळात गद्दाराच्या राजकीय अंत्ययात्रा निघणार आहेत. झडलेल्या झाडाची फुले पडली आहेत. आता नव्याने पुन्हा पालवी येऊन फुले डोलणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे,” असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.

Story img Loader