नाणारमध्ये रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू येथे आणण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी सर्वेक्षण आणि माती परीक्षण सुरू आहे. पण, याला स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे लवकरच बारसू येथे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं. आम्ही आहोत, बघूया काय होतं, ते,” असं नारायण राणेंची म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : Video: “सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल कंपनीसाठी, मराठी माणसांवर…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

“कोकणात येण्याची तारीख जाहीर करावी. आम्ही पण येतो, तिकडे बघूया… होऊन जाऊदे एकदाचं… कोकणातून मुंबई पळून जाण्यासाठी किती किलोमीटर लागेल… चालण्याची ताकद नसणाऱ्यांनी पळण्याचा विचार सुद्धा करू नये,” असा हल्लाबोल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

“कोकणात एकदा नाही दोनदा आपण पराभूत झाला आहात”

याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कोकण काय नारायण राणेंच्या बापाचं आहे का? येथे पाय ठेऊन देणार नाही, तिथे पाय ठेऊ देणार नाही. तुमचे पाय कुठेयात ते पाहा. काय आणि कोणाशी बोलताय? आपण केंद्रीय मंत्री आहात. पाय ठेऊन देणार नाही म्हणजे, कोणाची दलाली करत आहात. कोकणात एकदा नाही दोनदा आपण पराभूत झाला आहात. केंद्रीय मंत्री आहात प्रतिष्ठेने राहा. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका,” अशा शब्दांत संजय राऊतांनी नारायण राणेंना खडसावलं आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी जैतापूरचा प्रकल्प होऊ नये म्हणून…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

“आंदोलकांना न्यायालयात घेऊन जाताना जणू…”

“बारसूत लाठीचार्ज झाला नाही, असं सरकार म्हणत असेल, तर त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे. त्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या हे स्पष्ट दिसत आहे. तसेच, आंदोलकांना न्यायालयात घेऊन जाताना जणू अतिरेक्यांना नेण्यात येत आहे, एवढा पोलिसांचा फौजफाटा राजापूरच्या कोर्ट परिसरात होता,” अशी टीका संजय राऊतांनी सरकारवर केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks narayan rane over uddhav thackeray comment ssa
Show comments