मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशइतके स्वच्छ झालं आहे. तसेच, मिझोरामध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट आणि अन्य पक्षांत लढाई आहे. या लढाईत काँग्रेसचं अस्तित्व आहे. पण, मिझोराममध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा विजय होणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “तेलंगणात भाजपा स्पर्धेत नाही. भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून के. चंद्रशेखर राव आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी मतदारांना संदेश दिला आहे. पण, काँग्रेसला मतदान करू नये, असंही सांगण्यात आलं आहे. तेलंगणात भाजपाने ही रणनिती आखली आहे. मात्र, तेलंगणात काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगला निकाल समोर येऊ शकतो.”

“गेहलोतांनी पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे”

“छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होत आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत ‘जादूगर’ आहेत. गेहलोतांनी देशाच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. पाच वर्षानंतर राजस्थानात एखादं सरकार पुन्हा येत नाही. तिथे अटीतटीची लढाई आहे. तरीही राजस्थानमध्ये काँग्रेस बाजी मारणार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींनी पाच राज्यांमध्ये रान पेटवलं आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

“२०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे, पण…”

“भाजपा विकासाच्या कामावर मते का मागत नाही? प्रभू श्री रामाचे दर्शन मोफत दाखवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती, तर नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा अधिकार भाजपाला होता. २०१४ पासून काश्मीरी पंडितांच्या मुद्दयावरून भाजपा मते मागत आहे. पण, पुलवामात ४० जवानांची हत्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“…तर भाजपाची मान्यता रद्द केली पाहिजे”

“प्रभू श्री रामाचे मोफत दर्शन हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस बजावत पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे,” अशी मागणीही संजय राऊतांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks narendra modi over rajasthan madhya pradesh chattisagarh telangana election ssa
Show comments