पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस तुरुंगात होते. न्यायालयाने जामीन दिल्यानंतर संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतरही भाजपा आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून संजय राऊतांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जात आहे. याचा आता संजय राऊतांनी समाचार घेतला आहे.
‘टीव्ही ९ मराठी’च्या ‘रोखठोक’या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “अटक करण्यासाठी त्यांच्या बापाची न्यायालय आहेत का? मला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, हे न्यायालयाने म्हटलं. गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या अटका ह्या बेकायदेशीर होत्या, हे न्यायालयाने सांगितलं. अनिल देशमुख, चंदा कोचर आणि दिल्लीतील प्रकरणाबाबत न्यायालयाने ईडी आणि सीबीआयला फटकारलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि पोलिसांचा वापर करुन तुम्ही आम्हाला धमकावतं असाल, तर त्याला मी भिक घालत नाही.”
हेही वाचा : “ …तर मी म्हाडावर हक्कभंग दाखल करेन, उच्च न्यायालयातही जाणार” अनिल परबांचा इशारा!
“किती काळ धमक्या…”
“आम्ही एखादं वक्तव्य केलं की, तुरुंगात टाकू ही धमकी देण्यात येते. हे कायदा आणि न्यायालयाला आव्हान आहे. सत्तेचा गैरवापर करुन ह्या धमक्या देण्यात येतात. किती काळ धमक्या देणार आहात. प्रत्येक कुत्र्याचे दिवस येतात. भूंकत राहा,” असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
हेही वाचा : “फोन उचलत नाही कारणावरून तरुणीला निर्जनस्थळी नेलं, अन्…”, हिंगणघाटमधील धक्कादायक घटना समोर
“आमच्याविरोधात बोंबाबोंब करुन…”
“अनिल परब यांची जागा नसतानाही तेथील एका कार्यालयावर बुलडोझर फिरवण्यात आला. हे बेकायदेशीर आहे. पण, भाजपाने नेमलेले दोन-चार दलाल आमच्याविरोधात बोंबाबोंब करुन त्यांना प्रसिद्धी मिळते. अधिकारी दबावाखाली येत अशा कारवाया करतात. हे घटनाबाह्य आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.