सांगलीचे मनोहर भिडे हे आपले गुरुजी आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यांच्या गुरुजींनी गांधींपासून नेहरूंपर्यंत, साईबाबांपासून महात्मा फुलेंपर्यंत सगळ्यांची निंदा सुरू केली आहे. तणाव निर्माण करून दंगली भडकवण्याची ही ‘सुपारी’ आहे, असा आरोप शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या रोखठोक सदरातून केला आहे.

“एखाद्या व्यक्तीचा खून करण्याने विचार मरत नाहीत, कागद अगर पुस्तक जाळल्यानेही विचार नाहीसा होत नाही याची प्रचीती ‘गांधी-चरित्रा’ने येते. देशात मोदींचे सरकार आल्यापासून गांधींचा खून रोज होत आहे. पण तरीही मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांना कुठे ना कुठे तरी गांधी पुतळ्याचे उद्घाटन करावे लागते. गांधी विचाराने जग प्रभावित आहे. गांधींच्या गुजरातमध्ये मोदी सरकारने सरदार पटेल यांचा अतिउंच पुतळा उभा करून गांधी विचार कमी लेखण्याचा प्रयत्न केला. पण लोक गांधींना विसरायला तयार नाहीत,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Avinash Jadhav slam Sanjay Raut
MNS : “बाळासाहेबांना पण उभं राहायला ३७ वर्षे लागली होती”, मनसेचा वापर होतोय म्हणणाऱ्या राऊतांना अविनाश जाधवांचे सडेतोड उत्तर
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
sanjay gaikwad mutton liquor
Video : “मतदारांना फक्त दारू मटण पाहिजे; ते विकले…”, संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडीओने खळबळ
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन

हेही वाचा : रविकांत तुपकरांच्या पाठीमागे भाजपाचा हात? स्वाभिमानी हायजॅक करण्याचा प्रयत्न? राजू शेट्टी ठणकावून म्हणाले…

“देश किंवा समाज घडविण्यात कोणतेही योगदान नसलेली ही माणसे”

“गांधींना मारणाऱ्या गोडसेची जयंती काही लोक हिंदू म्हणून साजरी करतात. ही विकृती आहे. गांधींच्या पुतळ्यांवर, फोटोंवर गोळ्या मारून गोडसेला श्रद्धांजली वाहिली जाते. तरीही गांधी मरत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात ‘मनोहर भिडे’ नामक व्यक्तीने गांधींवर गलिच्छ शब्दांत चिखलफेक केली त्याची चिंता का करावी? मनोहर भिडे यांनी गांधींचा बाप मुसलमान होता असे जाहीर केले. हे विकृतीचे टोक आहे. भिडे हे गुरुजी म्हणून त्यांच्या समर्थकांत ओळखले जातात. देश किंवा समाज घडविण्यात कोणतेही योगदान नसलेली ही माणसे. त्यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष केलेले बरे. गांधीजींनी जेथे त्यांच्या खुन्यालाच माफ केले तेथे भिडे यांच्यासारख्यांची काय पत्रास!,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

“…हे असले ‘गुरू’ त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत”

“‘मनोहर भिडे हे आमचे गुरुजी आहेत,’ असे देवेंद्र फडणवीस अभिमानाने सांगतात, पण या गुरुजींनी फक्त गांधीच नाही, तर असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीचे साईबाबा व थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुलेंचादेखील गलिच्छ शब्दांत अपमान केला. त्यामुळे हे असले ‘गुरू’ त्यांचे त्यांनाच लखलाभ ठरोत,” असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल, तर गृहमंत्रीपदाचा वापर करून…”, ठाकरे गटातील नेत्याचं थेट आव्हान

“शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकवण्यात यांचे पूर्वज सक्रिय होते असे…”

“महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले ही गोष्ट गांधी-निंदा चालविणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना सहन होत नाही. हे सर्व लोक गांधींचा मत्सर करतात. गंमत अशी की, यापैकी बहुतेकांना अखंड हिंदू राष्ट्र हवे होते व पाकिस्तानची निर्मिती किंवा फाळणी गांधींमुळे झाली असा त्यांचा दावा आहे; पण या प्रखर विचारांचे हे लोक त्यांच्या क्रांतीचा झेंडा घेऊन स्वातंत्र्य लढ्याच्या रणात कोठेच दिसत नव्हते. शनिवारवाड्यावर ‘युनियन जॅक’ फडकवण्यात यांचे पूर्वज सक्रिय होते असे इतिहास सांगतो. यापैकी अनेक जण इंग्रजांचे एजंट म्हणून स्वातंत्र्य चळवळ नष्ट व्हावी म्हणून काम करीत होते व ‘चले जाव’ चळवळीस विरोध करून इंग्रजांना सहाय्यक ठरेल, अशा जाहीर भूमिका घेतल्या गेल्या. त्या विचारांचे वाहक गांधी, नेहरूंची निंदा आजही करतात याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.

Story img Loader