देशात मी म्हणजे सर्वस्व आणि मालक हे दिल्लीतही कधी चाललं नाही, तर गल्लीत काय चालणार. बाळासाहेब देसाई यांना लोकनेते का म्हणतात? याचा बालक, पालक आणि मालकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही आजही मुंबईत अनेक प्रसंगी बाळासाहेब देसाई यांचं उदाहरण देतो की नेता कसा असावा. म्हणून ते लोकनेते आहेत, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत सातारा आणि पाटण दौऱ्यावर आहेत. पाटण येथे संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “येथे कोणीही मालक होऊ शकत नाही, कारण देशात लोकशाही आहे. ही लोकशाही दिल्लीत आणि पाटणलाही आहे. त्यामुळे अनेकदा आपण पराभूत झाला, जिंकलात आता परत पराभूत होणार आहे,” असा इशाराही संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना दिला आहे.

Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?

हेही वाचा : “फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व कच्चाचिट्ठा, केवळ बाळासाहेब…”, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

“येथे राजेशाही नाही. राजांना सरकार म्हणण्याची पद्धत असू शकते. पण, राजांनाही लोकांतून निवडून येऊनच राज्य करावे लागते. मी म्हणजे सरकार आणि राज्य हा अहंकार वाढायला लागतो. तेव्हा लोक घरी पाठवतात. पाटणमध्ये ही वेळ आली आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी या माजी मुख्यमंत्र्यांना अनेकदा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

“आम्ही महाराष्ट्र आणि देशात फिरतो. आज पाटणला आहे, काल पाटण्यात होतो. महापालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं आव्हान शिवसेना आणि महाविकास आघाडीने दिलं आहे. निवडणुका घेतल्यास पश्चिम महाराष्ट्र काय महाराष्ट्रातील उद्रेक बाहेर पडल्याचं दिसेल,” असेही संजय राऊतांनी सांगितलं.