बारसूतील आंदोलक महिला, तरुण, वृद्धांवर लाठीचार्ज करत अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकारी खोटी माहिती देत, तेथे काही झालंच नाही, असं सांगतात. एकतर मुख्यमंत्री डोळेझाक करत आहेत किंवा त्यांची प्रशासनावर पकड नाही. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असतील, तर त्यांना बदललं पाहिजे, अशी मागणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“देवेंद्र फडणवीस परदेशातून आंदोलकांना फरफटत बाहेर काढा, बळाचा वापर करण्याचे आदेश देतात. बारसूतील आंदोलकांनी प्राण गेला, तरी चालेल, पण आम्ही जमीन न सोडण्याची भूमिका घेतली आहे. सरकारने आंदोलकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. मात्र, सरकार अमानूष पद्धतीने वागत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

हेही वाचा : “माझ्या सासुरवाडीचं फारच प्रेम उतू चाललंय, पण…”, ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर लावणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

“बारसू प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात समन्वय नाही. बारसूत सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल रिफायनरी कंपनी येणार आहे. त्या इस्लामिक ऑईल कंपनीसाठी रत्नागिरीतील मराठी माणसांवर बेदम हल्ले करण्यात येत आहेत. हे त्यांचं हिंदुत्व आहे,” असा हल्लाबोल संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

हेही वाचा : Video: “गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाहीतर…”, अजित पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी

‘बारसू प्रकरणी ठाकरे गटात मतमतांतर आहे,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्याबद्दल विचारल्यावर संजय राऊतांनी सांगितलं, “आमच्यात कोणतंही मतमतांतर नाही. उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यावर आमच्यातील मतमतांतर संपवून टाकतो. बारसू प्रकरणात उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे, तीच पक्षाची असेल. आमदार, खासदार आणि पदाधिकारी पक्षाच्या निर्णयाला बांधील आहेत,” असेही संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks shinde fadnavis government over barsu refinery project ssa