प्रसिद्ध अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव प्रस्तावित होता. परंतु, लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत ही जाहिरात बँक ऑफ बडोदाला मागे घ्यावी लागली. ५६ कोटी रुपयांची थकबाकी राहिल्याने हा बंगला लिलावासाठी काढण्यात येणार होता. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“सनी देओल यांनी ६०-७० कोटी रुपये बँकेचे थकवले. त्यामुळे बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव काढला. पण २४ तासांत दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांच्या बंगल्याचा लिलाव रद्द करण्यात आला. त्यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही मिळाला? असा सवाल संजय राऊतांनी आज विचारला.

Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

हेही वाचा >> “…म्हणजे स्वत:वर अंत्यसंस्कार करण्यासारखं”, अजित पवारांच्या सभेवर संजय राऊतांचं टीकास्र

“आत्महत्येआधी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई दिल्लीत गेले होते. स्टुडिओ वाचवण्याकरता किंवा कर्ज फेडण्यासाठी मुदत वाढवून देण्याकरता त्यांनी दिल्लीतील भाजपा नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी डोळ्यांतून पाणी काढल्याचंही म्हटलं जातंय. माझं स्वप्न वाचवा, असं ते म्हणाले होते. पण त्यांना वाचवलं नाही. दिल्लीतून येऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, असंही राऊत म्हणाले.

“सनी देओल भाजपाचे खासदार आहेत, भाजपाचे स्टार प्रचारक आहे. आमच्या महाराष्ट्रातील नितीन देसाईंना वेगळा न्याय, नितीन देसाईंना मरू दिलं, त्यांच्या स्टुडिओचा लिलाव होऊ दिलात”, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.