राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी दावा केला आहे की, “ऑगस्ट २०२० मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे तिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या भेटीनंतर शिवसेनेत चर्चा होती की आपण आता भाजपाबरोबर जायला हवं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीबरोबरच्या बैठकीत याबाबत माहिती दिली होती.” तटकरे यांच्या या दाव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे खोटं बोलत आहेत. आम्ही आमच्या पक्षातली चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन का सांगू? उलट मोदींबरोबरच्या बैठकीत काय झालं? हे उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा सांगितलं आहे. अनेक मुलाखतींमध्येदेखील सांगितलं आहे. त्यामुळे तटकरेंनी ही खोटी माहिती देऊ काही गौप्यस्फोट वगैरे केलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा