राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. वारिशे यांचा मृत्यू झालेला नसून ही राजकीय हत्या आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या मृत्यूप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. यावरच आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते ”टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टकीरण, म्हणाले, “हा आरोपी…”

हा मुद्दा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक नेत्याने उचलला पाहिजे

वारिशे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी तुम्ही केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीदेखील हीच मागणी केली आहे. जेव्हा तुम्ही मागणी केली त्यानंतर लगेच शरद पवार यांनीही हीच मागणी केली. आज हा मुद्दा घ्यायचा, असे तुम्हा दोन्ही नेत्यांचे काही ठरले होते का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना “वारिशे यांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीर आहे. या मुद्द्यावर प्रत्येकाने बोलले पाहिजे. एका पत्रकाराची हत्या होत आहे. हा मुद्दा या राज्यातील सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने उचलला पाहिजे,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. तसेच शरद पवार यांनी हा मुद्दा उचलला असेल तर मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे खळबळ, उदय सामंतांना द्यावे लागले स्पष्टीकरण; म्हणाले “तो फोटो…”

शशिकांत वारिशे यांची राजकीय हत्या

“शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात तेथील स्थानिक नेत्यांचा जिल्हा स्ताराच्या पोलिसांवर दबाव असू शकतो. नाणार रिफायनरी होऊ नये अशी आमची भूमिका होती. तीच भूमिका मृत्यू झालेल्या पत्रकाराचीही होती. प्रकल्प येणार आहे म्हणून बाहेरच्या श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी खरेदी केल्या. याविरोधात ते लढत होते. त्यांचा आवाज बंद होत नाही, हे समजल्यानंतर वारिशे यांची हत्या करण्यात आली. शशिकांत वारिशे यांची राजकीय हत्या आहे,” असा दावाही संजय राऊत यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on journalist shashikant warishe death and sharad pawar stand prd
Show comments