शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते मागील साधारण तीन महिन्यांपासून तुरुंगात होते. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर भाष्य केले आहे. कोणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये. तुरुंगातील दिवस फार कठीण असतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच मी तुरुंगात गेलो म्हणजे लढाई संपलेली नाही, असेदेखील संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.

“काही लोक दोन-दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. अनिल देशमुख हे तर दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. मला सारखं वाटतं की त्यांचा दोष नाहीये. सरकारने बनवलेल्या विशेष कायद्याचा गैरवापर सुरू आहे. कायद्याच्या राजकीय गैरवापरामुळे अनेक लोक तुरुंगात आहेत. ब्रिटिशांच्या काळातही अशा प्रकारचे कायदे नव्हते,” असे संजय राऊत म्हणाले.

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
lawrence bishnoi brother anmol bishnoi
लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा ठावठिकाणा लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

हेही वाचा >> राजीव गांधी हत्या प्रकरण : ‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकारार्ह,’ सर्व दोषींच्या सुटकेच्या आदेशानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया

“तुरुंगातील एक-एक तास शंभर दिवसांचा असतो. तुम्ही कितीही मोठे असले तरी तुरुंगात कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. वीर सावरकर दहा-दहा वर्षे अंदमानला कसे राहिले असतील. मंडालेमध्ये लोकमान्य टिळक कसे राहिले असतील. आणीबाणीच्या काळात अनेक नेते अडीच-अडीच महिने तुरुंगात होते. हे सगळे लोक तुरुंगात कसे राहिले असतील, याचा मी विचार करतो. तुरुंगात जाण्याची कोणावरही वेळ येऊ नये,” असे संजय राऊत म्हणाले.

“प्रत्येकाने तुरुंगात जाण्याचे टाळले पाहिजे. अनेक चांगले उद्योगपती तुरुंगात आहे. ज्यांच्याविषयी आपल्याला आदर आहे, ते लोकदेखील तुरूगांत आहेत. मी तरुंगात जाऊन आलो, म्हणजे लढाई संपलेली नाही,” असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.