Sanjay Raut : आपल्या सरकारला खून पचवायची सवय आहे. बीडचे आका, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह असलेले फोटो. त्यांचा वावर, त्यांचा मंत्र्यांशी असेलला संवाद हे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात शंका येते आहे की खरंच न्याय मिळेल का? देवेंद्र फडणवीस फक्त बोलत आहेत की कुणालाच सोडणार नाही. पण आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी जणांना कसं सोडलं आहे आणि किती जणांना कसं अडकवलं आहे? या विषयावर एक एसआयटी नेमली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलंय?

देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना सोडलं आहे? किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना आपल्या सरकारमध्ये घेतलं आहे? किती जणांचे आक्रोश आणि किंकाळ्या दाबल्या आहेत? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच एसआयटी स्थापन केली पाहिजे. बीडच्या हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस गंभीर आहेत असं कळलं आहे. कारण शेवटी ही महाराष्ट्राची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी. एक वाल्मिक कराडला अटक केली. पण बीडमध्ये हा खटला चालवू नये अशी माझी मागणी आहे. हा इतका गंभीर विषय आहे की हा खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. महाराष्ट्रात कुठेही खटला चालला तरीही न्याय मिळण्याची शक्यता नाही तरीही मानतो की मुख्यमंत्र्यांवर सध्या तरी विश्वास ठेवू.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
sanjay raut house recce
संजय राऊत रेकीवर मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान…म्हणाले मच्छर…
Sanjay Raut On Maharashtra Vidhan Sabha Election Result
Sanjay Raut : संजय राऊत यांचं वक्तव्य, “महाविकास आघाडी आहे, स्वबळावर…”
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने कोणतंही ठोस…”

बीड क्लिंटनची सगळी प्रकरणं…

बिल क्लिंटन आम्हाला माहीत होता आता बीड क्लिंटन आला आहे. देवेंद्र फडणवीसांना सगळी प्रकरणं माहीत आहेत. त्यांनी या राज्याचा कलंक धुवून काढण्यासाठी तसंच जबाबदारीने काम करतो आहे यासाठी त्यांनी गुन्हेगार कितीही मोठा असो त्याचा विचार न करता न्याय दिला पाहिजे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Walmik Karad : “लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो”, पोलीस कोठडीतील वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

उद्धव ठाकरे बीड आणि परभणीत काय होतं? त्याकडे लक्ष ठेवून आहेत-राऊत

उद्धव ठाकरे बीड आणि परभणीतल्या घटनांबाबत आमच्याशी चर्चा करत आहेत. त्याकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये हा त्यांचा उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय पावलं उचलतात हे आम्ही पाहात आहोत. तपासाला एक दिशा आणि गती मिळाली की उद्धव ठाकरे हे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला भेटणार आहेत. मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभेत आम्ही भाजपाचा पराभव केला. विधानसभेच्या वेळी चुका झाल्या, त्या काय होत्या? हे सगळ्यांनाच कळलं आहे. आता मुंबई महापालिकेवर आम्ही आमचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणारन नाही असंही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader