भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी याबाबतची घोषणा केली. आडवाणी यांचा सन्मान हा भावनिक क्षण असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आडवाणी यांच्याबरोबरीने बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. पण राजकीय सोय पाहण्याकरता सरकार अशा प्रकारची खिरापत वाटत आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये संघ परिवारातील सर्वाधिक लोक आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. ते आज माध्यमांशी बोलत होते.

Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
ajit pawar on ravi rana
विनाशकाले विपरीत बुद्धी! ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी त्यांना…”
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Aishwarya Narkar On Zee Marathi Awards
“दोन्ही वर्षी पुरस्कार मिळाला नाही, थोडं हिरमुसल्यासारखं…”, ऐश्वर्या नारकरांनी हुकलेल्या अवॉर्डवर मांडलं मत, म्हणाल्या…

तसंच, वर्षभरापूर्वी लालकृष्ण आडवाणींना पद्मविभूषण दिलं गेलं. आता भारतरत्न दिलं आहे. यानंतर त्यांना कोणती पदवी देणार आहेत? त्यांना तुम्ही राष्ट्रपती बनवू शकत होता. पण त्यांनी तसं केलं नाही”, अशीही टीका त्यांनी केली.

हेही वाचा >> छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातलं हे राजकारण…”

“लालकृष्ण आडवाणींचं देशातील राजकारणात मोठं योगदान आहे. राम मंदिरासाठी रथयात्रेचा लढा सुरू केला नसता तर आजचा भाजपा तुम्हाला दिसला नसता. भाजपाचे पूर्वी फक्त दोन खासदार होते, आता भाजपा ३०० पार झाला तो आडवाणींमुळेच. आडवाणींनी सातत्याने वाजपेयींची पाठराखण केली. अब की बार अटलबिहारी सरकार अशी घोषणा आडवाणींनी दिली. त्यांची पंतप्रधान होण्याची क्षमता असतानाही त्यांना दूर सारलं गेलं. त्यांना इतकं गृहित टाकलं की आडवाणींना लोक विसरून गेले”, असंही ते म्हणाले.

छगन भुजबळांवर टीकास्र

“छगन भुजबळांनी राजीनामा दिला आहे, मंत्रिमंडळात काम करू इच्छिता, ओबीसींसाठी काम करू इच्छिता आणि तुमचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर ही मिलीभगत आहे. लोक म्हणत आहेत की छगन भुजबळांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल? कॅबिनेटमध्ये जेव्हा सरकार किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली जाते तेव्हा संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसतो”, असं संजय राऊत म्हणाले.