शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीस असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं करतील, असं वाटलं नव्हतं,’ असे पवार म्हणाले आहेत. दरम्यान फडणवीसांच्या याच विधानावर आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना काहीच माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबतचे रहस्य बाहेर येण्यास वेळ लागेल, असे राऊत म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> ‘पहाटेच्या शपथविधी’वर फडणवीसांकडून गौप्यस्फोट, काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनीही केले मोठे विधान; म्हणाले, “शरद पवार…”

Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : महाविकास आघाडी तुटणार? संजय शिरसाटांचा मोठा दावा; म्हणाले, ‘शरद पवारांचा गट लवकरच सत्तेत…’

…हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही

“फडणवीसांनी केलेले विधान काही गौप्यस्फोट नाही. गौप्यस्फोटापेक्षा त्याला फेकाफेक म्हटले जाते. ही फेकाफेक आहे. अचानक फेकाफेकीला महाराष्ट्रात का उत आलेला आहे? महाराष्ट्रात त्यांचे सरकार आले आहे. सत्ता असूनही मला यांच्यात नैराश्य, वैफल्य दिसत आहे. पण अशा प्रकारे ज्या घटनेविषयी आपल्याला माहितीच नाही, त्यावर फेकाफेकी करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> IT Raid On BBC Office : BBC च्या कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक, मोदी सरकारवर केला गंभीर आरोप!

देवेंद्र फडणवीस यांना मी सभ्य…

“लोकांना खरा चेहरा समजला आहे. भाजपा सत्तेसाठी किती आसुसलेला पक्ष आहे. त्यांनी पहाटेचा शपथविधी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते जमले नाही. दोन ते तीन वर्षे त्यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. आज ते आमच्या संपर्कात काँग्रेसचे एवढे लोक आहेत, तेवढे लोक आहेत, असे सांगतात. देवेंद्र फडणवीस यांना मी सभ्य सुसंस्कृत, काळाचे भान असलेले नेते समजत होतो. मात्र मागील चार ते पाच महिन्यांपासून त्यांची लय बिघडत आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा >>> IT Raid On BBC Delhi Office : BBC च्या दिल्लीतील कार्यालयावर धडकले प्राप्तिकर

शरद पवारांनी ठरवलं असतं तर

“त्या काळात मी शरद पवार यांच्या सर्वाधिक संपर्कात होतो. शरद पवारांनी ठरवलं असतं तर पहाटेच्या शपथविधीचे सरकार चालले असते. मुळात शरद पवार यांची लोकशाहीवर श्रद्धा आहे. राज्याचे स्थैर्य त्यांच्या चिंतनाचा विषय असतो. पहाटेच्या शपथविधीचे सत्य कोणाला जाणून घ्यायचे असले, तरी ते इतक्या सहजपणे उलडता येणार नाही. त्याला थोडा वेळ लागेल. पहाटेच्या शपथविधीचे रहस्य आणि सत्य देवेंद्र फडणवीस कधीच सांगू शकणार नाहीत. त्यांना काहीच माहीत नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader