Veer Savarkar Death Anniversary 2023: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलत असताना संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे असं वारंवार म्हटलं जातं. त्यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्यांचा खरा गौरव करावा, अशी मागणी आम्ही आधीपासून करत आहोत. सावरकरांना भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की, त्यांच्या तोंडाला फेस येतो. वीर सावरकरांचा अपमान काही लोक देशात वारंवार काही लोक करत आहेत, त्यांना उत्तर द्यायचे असेल तर स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांनी सावरकरांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी करत असताना संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली.

हे वाचा >> Kasba, Chinchwad Bypolls: कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…”

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

सावरकरांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर

“वीर सावरकर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातले महान क्रांतिकारक होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. अंदमानमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ व्यक्त केला. सामाजिक कार्यातही त्यांनी सहभाग घेतला होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सावरकरांकडून हिंदुत्त्वाची प्रेरणा घेतली. सध्याचे राज्यकर्ते केवळ मतांसाठी आणि राजकारणांसाठी सावरकर यांचा वापर करत आहेत. वीर सावरकर यांचा देशात वारंवार अपमान करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर त्यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करावं”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची सावरकरांवर टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना सावरकरांवर टीका केली होती. त्याआधीही अनेकवेळा त्यांनी सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती. मात्र महाराष्ट्रात येऊन सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे काँग्रेससह ठाकरे गटाचीही चांगलीच कोंडी झाली होती. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता, त्यामुळे राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याला ठाकरे गटाचे समर्थन आहे का? असा सवाल भाजपाकडून उपस्थित केला जात होता. संजय राऊत यांनी भारतरत्न देण्याची मागणी करत असतानाच सावरकरांवर वारंवार टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

ओवैसी आणि भाजपाची राम-श्यामची जोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत, ते कधीही एकत्र येऊ शकतात अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ठाकरे आणि शिंदेवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देत असताना संजय राऊत म्हणाले, खरी राम श्यामची जोडी तर ओवैसी आणि भाजपाची आहे. ओवैसी यांचा पक्ष भाजपाची बी टीम आहे. मतदान खाण्यासाठी एमआयएम काम करते. जिथे भाजपाला विजय मिळवून द्यायचा आहे, तिथे ओवैसी पोहोचतात. राम-श्यामचा जुमला ओवैसी यांनाच शोभतो. शिवसेना स्वतःच्या पायावर उभी आहे, जे सोडून गेले त्यांना परत माघारी फिरून आम्ही पाहत नाही, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.