कथित पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात आता न्यायालयीन कोठडी जाण्यापूर्वी संजय राऊतांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहलं आहे. या पत्रात ईडी अधिकाऱ्यांचा दबाव, अटक करातेवेळीचा प्रसंग, शिवसेनेतील फूट आणि अन्यही विषयांवरती राऊतांनी पत्रातून भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पत्राचाळ प्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊतांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली होती. त्या प्रसंगाचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. “रविवारी १ ऑगस्ट रोजी ईडीचे अधिकारी घरात घुसले, तेव्हा तू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो खाली खंबीरपणे बसून होती. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस. हा प्रसंग आपल्यावर येणार आहे, हे बहुधा मनात तू पक्के केले होतेस.

हेही वाचा – “बंदुकीचा धाक दाखवत माझ्याविरोधात…” संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

“पण, संध्याकाळी घेऊन जाताना मला तू मिठी मारलीस आणि रडली. बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते, त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. ‘लवकर परत ये म्हणालीस’. खिडकीतून मला होत केलास. जसा तू रोज ‘सामना’त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितही तू अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता,” असेही संजय राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.