Sanjay Raut Live Update : भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर केला आहे. दरम्यान, याप्रकरणी संजय राऊतांनी गौतम अदाणींवर आणि सत्ताधारी पक्षावर टीका केली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“अमेरिकेत अदाणींविरोधात अटक वॉरंट निघालंय. ट्रम्प यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर अदाणींविरोधात वॉरंट काढलं. महाराष्ट्रातील अनेक टेंडर्सही गौतम अदाणींनी बळकावण्याचा प्रयत्न केला, असं संजय राऊत म्हणाले.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका

संजय राऊत पुढे म्हणाले, “ट्रम्प प्रशासनाने अदाणींविरोधात अटक वॉरंट काढलंय. हे देश, मोदी आणि पूर्ण भाजपासाठी शरमेची गोष्ट आहे. अदाणीमुळे या देशाला एक डाग लावलाय. म्हणून महाराष्ट्राला अदाणीराष्ट्र बनवणार नाही.”

हेही वाचा >> गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप

देशासाठी ही शरमेची बाब

“धारावी ते एअरपोर्टपर्यंत सर्व अदाणींना विकलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडणुकीत २ हजार कोटींहून अधिक पैसा खर्च केलाय. हा भ्रष्टाचार आहे, ही लाच आहे. त्यासाठीच ट्रम्प सरकारने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. ही देशासाठी शरमेची बाब आहे. आणि अशा लोकांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था मोदी देत आहेत”, असंही संजय राऊत म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट, यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले, “भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.”

v

एक्झिट पोल्सवर काय बोलले संजय राऊत?

“आम्ही २३ तारखेलाच संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीच्या १६० ते १६५ जागा निवडून येत आहेत. त्यामुळे या एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवू नये. हे शिंदे आणि फडणवीसांचं षडयंत्र आहे. सत्तास्थापनेइतके बहुमत मिळणार असून २३ तारखेला सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आमचा मुख्यमंत्री कोण असणार हे सांगणार”, असंही संजय राऊत म्हणाले.

s

Story img Loader