Sanjay Raut : भाजपाचं अधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलं. या अधिवेशनात अमित शाह यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शाह यांनी केला आहे असं राऊत म्हणाले आहेत.

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?

महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.

Torres Scam
Torres Scam : टोरेस कंपनीचा सीईओ दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे; पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक बाब उघड!
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे पण वाचा- Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”

उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान-राऊत

उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या नेत्यांवर सडक्या शब्दांत टीका करतात-राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

परळीत ज्यांना मोक्का लावला ती पोरंटोरं-संजय राऊत

परळीत जे काही घडलं आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरुच राहिल. काही पोराटोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. ज्यांना मोक्का लावला आहे ते भाडोत्री आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे, त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत नाही का? गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

इंडिया आघाडी बळकट झालं पाहिजे-राऊत

शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतं आहे की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे. देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ती म्हणजे मोदी आणि शाह. संविधानावर हल्ले होत आहेत. हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader