राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. वारिशे यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. त्यानंतर आता वारिशे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, याच प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदय सामंत यांचा मी या मृत्यूप्रकरणाशी संबंध लावत नाहीये, असे राऊत म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे खळबळ, उदय सामंतांना द्यावे लागले स्पष्टीकरण; म्हणाले “तो फोटो…”
हा आरोपी किती चतूर आहे, असे माझे मी म्हणत आहे
“मी उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध लावत नाहीये. या निमित्ताने अनेक वेगवेगळे फोटो समोर आणले जातात. मात्र हा आरोपी किती चतूर आहे, असे मी म्हणत आहे. तो सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याचे अनेक राजकीय लोकांसोबत संबंध आहेत. राजकीय लोकांसोबत फोटो काढणे आणि भ्रम निर्माण करणे, असे त्याच्याकडून केले गेले. या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात कोणाचाही दबाव नसावा असे माझे मत आहे. महाराष्ट्रीतल सध्याचे सरकार गुन्हेगारांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत,” असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
हेही वाचा >>> Shashikant Warishe Murder: “…आणि लगेच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली” संजय राऊतांचं मोठं विधान!
बाहेरच्या श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी खरेदी केल्या
“शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात तेथील स्थानिक नेत्यांचा जिल्हा स्ताराच्या पोलिसांवर दबाव असू शकतो. नाणार रिफायनरी होऊ नये अशी आमची भूमिका होती. तीच भूमिका मृत्यू झालेल्या पत्रकाराचीही होती. प्रकल्प येणार आहे म्हणून बाहेरच्या श्रीमंत लोकांनी तेथे जमिनी खरेदी केल्या. याविरोधात ते लढत होते. त्यांचा आवाज बंद होत नाही, हे समजल्यानंतर वारिशे यांची हत्या करण्यात आली. शशिकांत वारिशे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा >>> “कोण रोहित पवार?” प्रणिती शिंदेंच्या टीकेनंतर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्या माझ्या…”
अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात
संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “संजय राऊतांना जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढतात. तसाच तोही एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्या व्यक्तीचे राज्यातील अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेही ते पाहिलेले आहे. जो कोणी नेता त्याच्यासोबत आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते,” अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.