Sanjay Raut : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून चार दिवस झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री मिळालेला नाही. मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच असतील असे संकेत आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा या सगळ्या पेचावरुन भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळून १४० जागा मिळाल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी ( Sanjay Raut ) केलं आहे. असं जर असेल तर बहुमत लोकांनी का दिलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
uddhav thackeray replied to devendra fadnavis dharmayudhha criticism
“आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला!
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!

दिल्लीश्वरांनी जी भुतं तयार केली ती आता त्यांनाच घाबरत नाहीत-राऊत

दिल्लीश्वरांनी जे बंडखोर तयार केले जी भुतं तयार केली ती आधी दिल्लीने डोळे वटारले की गप्प बसायचे. आता ही भुतं त्यांना घाबरत नाहीत असं दिसतं आहे. ही भुतं आता मोदी आणि शाह यांनाच आव्हान देत आहेत. त्यामुळे सरकार कधी येईल? मुख्यमंत्री राज्याला कधी मिळेल ? या प्रश्नांबाबत राज्यात संभ्रम आहे. आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल आणि सरकारचा कारभार सुरु होईल असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा…”

भाजपाची भूमिका गरज सरो आणि वैद्य मरो अशीच-राऊत

भाजपाची भूमिका ही गरज सरो आणि वैद्य मरो किंवा वापरा आणि फेका अशी आहे त्यामुळे त्यांनी काय शब्द दिला असेल तो काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्ष कधीही शब्द पाळत नाही. त्याचा सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला भोगावा लागला आहे. शब्द पाळणं हे भाजपाला मान्य नाही ते कधीही शब्द पाळत नाहीत. शब्द कुठेही दिला असो पण भाजपा शब्द पाळत नाहीत ती नैतिकता भाजपाकडे उरलेली नाही. पक्ष फोडण्यासाठी एखाद्याची गरज असते तेव्हा आश्वासनं आणि वचनांची बरसात करतात. त्यानंतर काम झालं की त्या व्यक्तीला लाथा घालतात हे महाराष्ट्राला दिसलं आहे. शिवसेना आणि भाजपा एकत्र होती तेव्हाही आम्ही हा अनुभव घेतला आहे असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

पाशवी यश देशाला घातक असतं

भाजपाला पाशवी यश मिळालं आहे. असं पाशवी यश देशाला आणि राज्याला घातक असतं. यामुळे भ्रष्टाचार वाढतो, हुकूमशाही वाढते. भाजपाने कुणाला मुख्यमंत्री करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राला सरकार मिळालं पाहिजे जनतेची अपेक्षा आहे ती चुकीची नाहीत. लाडक्या बहिणी २१०० रुपये कधी मिळणार त्याची वाट बघत आहेत. शेतकरी कर्ज माफीची वाट बघत आहेत. बेरोजगार नोकरी मिळण्याची वाट बघत आहेत त्यामुळे सरकार लवकर स्थापन झालं पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले.

निवडणूक आयोग, न्यायालयचं यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?

राज्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती देशात आणि राज्यात उरली आहे का? गौतम अदाणींच्या भ्रष्टाचारावर बोलणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो, ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी देशाचे पंतप्रधान जाऊन मोदक खातात, न्यायालयं दबावाखाली वावरतात, निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य राहिलेलं नाही अशांवर काय विश्वास ठेवायचा? आम्ही परिस्थिती पाहिली आहे. गुंडांच्या टोळ्या मतदारांना कशा रोखत होत्या ते आम्ही पाहिलं आहे. यंत्रणेचा गैरवापर अनेक ठिकाणी झाला आहे. असाही आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.

एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री करु असं आश्वासन दिलं गेलं असेल, राऊतांचा टोला

एकनाथ शिंदेंना केंद्रात गृहमंत्री करतो असं आश्वासन दिलं गेलं असेल. १४० जागा भाजपाकडे आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचा होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंना भविष्यात पंतप्रधान करतो असंही आश्वासन दिलं गेलं असेल असाही टोला संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.