लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची चिन्ह दिसत असताना महाराष्ट्रात मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जागावाटपाचा तिढा सोडवा, असे आवाहन केले आहे. यानंतर आज अमरावती येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर मोठा आरोप केला.

संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात

वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत, असे खोटे विधान संजय राऊत माध्यमांसमोर करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. आंबेडकर पुढे म्हणाले, अद्याप मविआमधील तीन पक्षांची भांडणे मिटलेली नाहीत. त्यांची भांडणे मिटलेली नसताना ते एकत्र जाणार की मैत्रीपूर्ण लढत देणार, याचा निकाल त्यांनी लावलेला नाही. त्यांचा निकाल लागत नाही, म्हणून आम्ही काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधून काँग्रेस आणि आपण एकत्र लढू, असा प्रस्ताव दिला.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
zopu yojana audit
मुंबई : थकित भाड्याची तक्रार आल्यास आता झोपु योजनेचे ॲाडिट!

‘तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत’, प्रकाश आंबेडकरांच्या नव्या मागणीमुळे ठाकरे गटासमोर पेचप्रसंग

प्रकाश आंबडेकर पुढे म्हणाले की, रमेश चेन्नीथला यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात आम्ही सर्व माहिती देण्यात आली आहे. मविआचे जागावाटप होत नाही, तोपर्यंत काँग्रेस आणि वंचितचे जागावाटप करून घेऊ, असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र त्यालाही अद्याप काँग्रेस कार्यालयाकडून प्रतिसाद आलेला नाही.

प्रकाश आंबेडकरांची भूमिका संशयास्पद आहे का? संजय राऊत म्हणाले…

नवनीत राणा सर्वात मोठ्या लबाड

खासदार नवनीत राणा या सर्वात मोठ्या लबाड असल्याचाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जातीच्या दाखल्याबाबत त्यांनी बनावट कागदपत्रे दिले असल्याचे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे लवकरच नवनीत राणा तुरुंगात गेलेल्या दिसतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Story img Loader