राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघाती मृत्यू होता मात्र ही हत्याच आहे असा दावा अनेकजण करत आहेत. असाच दावा आता संजय राऊत यांनीही केला आहे. या घटनेचे पडसाद आता उमटण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत आहेत याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी पत्रात?

मा. देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्यात ढासळणाऱ्या कायदा सुव्यस्थेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे राज्याच्या गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्या दिवसाढवळ्या खून पडावेत आणि संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
daughter cannot claim property if father dies before Hindu right of succession takes effect
हिंदू वारसा हक्क अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू, मुलीला मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

रत्नागिरी जिल्ह्यातली राजापूर येथील तरूण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले गेले असले तरीही ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरूद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करत होते आणि रिफायनरीचे समर्थक म्हणवून घेणारे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना धमक्या देत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. आपले मत याबाबत वेगळे असले तरीही स्थानिक जनता रिफायनरीच्या विरोधात संघर्ष करते आहे. शशिकांत वारिशेसारखे पत्रकार लोकांना जागृत करत होते हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणं महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

४ फेब्रुवारी २०२३ च्या आंगणेवाडी जत्रेत भाजपाची एक जाहीर सभा झाली त्या सभेत आपण ठासून सांगितले की नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतो आहे पाहू आणि आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाहीत तोच वारिशे यांची हत्या झाली हा योगायोग समजावा का?

दुसरा मुद्दा असा की महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी रिफायनरीला विरोध दर्शवणाऱ्यांना धमक्या देण्यास सुरूवात केली. त्यासाठी पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांचीही मदत घेतली गेली. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता. रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागली असा इशारा दिला गेला होता. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांमधल्या गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला आणि वारिशे यांची हत्या झाली असे आपणास वाटत नाही का? असा प्रश्न विचारणारं हे पत्र संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.