राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ते ४० आमदारांना घेऊन भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असल्याचंही बोललं जात होतं. यावर अजित पवारांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या संभाव्य बंडखोरीबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात दबक्या आवाजात बोललं जात आहे. दरम्यान, आज मुंबईत महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडत आहे. या सभेला अजित पवार उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावरून आज सकाळपासून प्रसारमाध्यमांकडून विविध प्रश्न विचारले जात होते.

हेही वाचा- राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली? अजित पवारांच्या बंडखोरीबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

या संपूर्ण घटनाक्रमानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या उपस्थितीबाबत मिश्कील वक्तव्य केलं आहे. अजित पवारांना सगळ्यांचं आकर्षण आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय अजित पवार वज्रमूठ सभेत येणार…बोलणार… आणि जिंकणार असं विधान संजय राऊतांनी केलं आहे. यावेळी अजित पवार मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा- “थोड्या दिवसांचा खेळ आहे, हे सरकार…” आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल!

‘वज्रमूठ’ सभेत अजित पवारांकडे पाहत संजय राऊत म्हणाले, “इथे अजितदादा बसले आहेत. दादा, सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. आज सकाळपासून दादा वज्रमूठ येणार आहेत का? दादा येणार आहेत ना? असं विचारलं जात होतं. यावर आम्ही म्हणतो… दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार…”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut live speech at vajramooth sabha statement on ajit pawar rmm