शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये गेल्या अडीच वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, टोमणे-प्रतिटोमणे असा कलगीतुरा सुरूच आहे. अजूनही रोजच त्याचे नवनवे अंक पाहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक या आपल्या सदरामध्ये चंद्रकांत पाटलांच्या याच विधानावरून त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. तसेच, ही चमचेगिरी असल्याचं म्हणत त्यावर टीका देखील केली आहे.

“मोदी चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान”

“मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है” असं म्हणत संजय राऊत यांनी रोखठोक सदरामधून खोचक टोले लगावले आहेत. “देशाचे पंतप्रधान मोदी चमचेगिरीच्या अतिरेकामुळे परेशान झाले आहेत. काँग्रेसच्या काळात चमचे होते. मोदी काळात अंधभक्त आहेत. फक्त नामांतर झालं. काम तेच”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “देवकांत बरुआ यांनी इंदिरा इज इंडिया म्हटलं होतं, मोदी भक्तांनी मोदी इज इंडिया असं जाहीर केलंय. जे मोदींबरोबर नाहीत, ते देशाबरोबर नाहीत, असं टोक भक्तांनी गाठलंय”, असं देखील राऊत यांनी या लेखात नमूद केलं आहे.

minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

“इतके मानसिक बळ येते कुठून?”

चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या एका विधानाचा संदर्भ घेऊन संजय राऊतांनी त्यांच्यावर आणि भाजपावर खोचक टोलेबाजी केली आहे. “महाराष्ट्रातील चंद्रकांत पाटील यांनी आता कडेलोट केला आहे. पाटील यांनी अंधभक्तीच्या चिपळ्या वाजवत सांगितलं नरेंद्र मोदी हे अखंड काम करतात. ते बावीस तास काम करतात आणि फक्त दोनच तास झोपतात. आता ही दोन तासही झोप येऊ नये, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पाटलांची ही विधानं ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल. भक्तांना आणि चमच्यांना इतकं मानसिक बळ येतं कुठून? हा संशोधनाचा विषय आहे”, असा खोचक सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘मोदी दोनच तास झोपतात’, आता गीतेचा संदर्भ देत सचिन सावंतांनी लगावला टोला, म्हणाले ‘हे अर्जुन…’

रशिया-युक्रेन युद्ध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, या लेखात रशिया-युक्रेन युद्धावरून देखील मोदींवर टोला लगावण्यात आला आहे. “युद्धात मोदंना कसं ओढायचं, यावर भक्त मंडळींमध्ये प्रचंड खल झाला असावा. शेवटी एक दिवस भक्तांच्या वृत्तवाहिन्यांवर आणि समाज माध्यमांवर बातम्या झळकल्यायच. मोदींनी पुतीन-बायडेन यांच्याशी एक तास चर्चा केली. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मदत मागितली. मोदींचा सल्ला पुतीन-बायडेन यांनी मानल्याचंही प्रसारित झालं. पण सत्य असं, की पुतीन यांनी युक्रेन बेचिराख केलं आहे. पुतीन-बायडेन मोदींच्या ऐकण्यातले होते, तर मग दोघांमध्ये युद्ध का पेटलं?” असा सवाल देखील राऊतांनी केला आहे.

“देवांचीही झोप उडाली असेल”

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल, असं राऊत या लेखात म्हणाले आहेत. “जे राज्य चमचे निर्माण करतात, ते चमच्यांचे बनते. त्यातून अंधभक्तांची फौज निर्माण होते. मोदी चंद्रकांत पाटलांचे देव आहेत. देवांनाही चमचे होते. पण देव झोपत नव्हते असं चमचे म्हमाले नाहीत. मोदी अखंड जागे राहतील असं जाहीर करण्यात आल्यामुळे स्वर्गात देवांचीही झोप उडाली असेल. देवांची झोप उडवण्याची ताकद चमच्यांत आणि भक्तांत आहे”, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

Story img Loader