राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्याचे पडसाद इतर घडामोडींवरही उमटताना पहायला मिळत आहेत. शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सध्या चालू आहे. यासंदर्भात संजय राऊतांनी केलेल्या एका विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले होते. त्यांनी केलेल्या टीकेवर आता पुन्हा संजय राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या सगळ्याला सुरुवात झाली ती शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी थेट काँग्रेसशी राष्ट्रवादीची तुलना केली. “काँग्रेसमध्येही अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. पण त्यांचा पक्ष सोनिया गांधींकडे बघून चालतोय. त्यामुळे राष्ट्रवादीत अध्यक्ष कुणीही झालं, तरी शरद पवार पक्षाचे सर्वोसर्वा राहतील, त्यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही”, अशा आशयाचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. यासंदर्भा नाना पटोलेंनी राऊतांवर टीका केली होती.

home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Special modak making classes for visually impaired women
हात जेव्हा डोळे होतात…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…

सुप्रिया सुळे खरंच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार? वाय. बी. सेंटरमधील चर्चेनंतर प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले…

राऊतांनी चोंबडेगिरी बंद करावी – नाना पटोले

“ही चोंबडेगिरी संजय राऊतांनी बंद केली पाहिजे. आम्ही वारंवार सांगितलंय की आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत नाहीत. उद्या उद्धव ठाकरे नसून संजय राऊत निर्णय घेतात असं म्हणणार का? खर्गे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. अशा व्यक्तीचा असा अपमान करण्याचं काम संजय राऊत करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

“चाटूगिरी करू नका, चोंबडेपणा थांबवा”; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले…

“नाना पटोलेंपेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात”

दरम्यान, यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून खोचक टोला लगावला. “ते नाना पटोले आहेत. काय एवढं गांभीर्यानं घेताय त्या माणसाला? त्यांचा पक्ष त्यांना गंभीर्यानं घेत नाही. मी राहुल गांधींशी यावर चर्चा करेन. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात”, असं संजय राऊत म्हणाले.