राज्यात सध्या सत्ताधारी शिंदे गट व भाजपा आणि विरोधी पक्षात असणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये राजकीय सुंदोपसुंदी चालू असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी मंदिर नाट्यगृहातील ठाकरे गटाच्या बैठकीमध्ये बोलताना ठाकरे गटाच्या नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, खोचक टोलेबाजी झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. या बैठकीत बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा”

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी ‘औरंग्याच्या पिलावळी महाराष्ट्रात अचानक कशा जन्माला आल्या’, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. “त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या पिलावळी कशा जन्माला आल्या. तुम्हीच जन्माला घातल्या. मी त्यांना सांगू इच्छितो, त्यांचा इतिहास कच्चा आहे. औरंगजेबाचं त्यांना फार कौतुक आहे. त्याचं कारण मी शोधलं. औरंगजेबाचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही. त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला. तिथल्या दाहोत नावाच्या गावात औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून तुमच्या अंगात औरंग्या संचारला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“सत्तेसाठी उद्धव ठाकरे मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला”, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर, म्हणाले, “तुमचंच भूत…”

“आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे जन्माला आले. पण दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत यांच्या अंगात औरंग्या संचारला आहे. एका औरंगजेबाला गाडला, १०० औरंगजेब आले, तरी आम्ही त्यांना अंगावर घेऊ”, असं ते यावेळी म्हणाले.

“…फिर आप कभी लौट कर वापस नहीं आओगे”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या शेरोशायरीवरही खोचक टीका केली. “देवेंद्र फडणवीस फार सुंदर भाषणं करतात. त्यांच्याकडे कुठून एवढी ऊर्जा येते मला कळत नाही. एका बाजूला म्हणायचं आम्ही उर्दूला विरोध करतो. दुसऱ्या बाजूला उर्दू शेरोशायरी करायची. परवा ते म्हणत होते की ‘मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मै समंदर हू, लौट कर जरूर आऊंगा.. मी आलो, येताना शिंदेंनाही घेऊन आलो’. आम्हाला खात्री आहे की हे शिंदेच तुम्हाला समुद्रात बुडवल्याशिवाय राहणार नाहीत. और फिर आप लौट कर वापस कभी नही आओगे ही काळ्या दगडावरची रेघ आहे”, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

“तुम्ही या मुंबईमध्ये कुणाला सांगताय समुद्राच्या गोष्टी? शिवसेना हाच एक समुद्र आहे. बुडवून टाकू. आमच्या लाटांच्या तडाख्याच्या समोर उभे राहू नका. नागपूरला समुद्र आहे का? दोनच समुद्र आहेत. एक अरबी महासागर आणि दुसरा शिवसेनेचा सागर जो कायमच बाळासाहेबांच्या विचारांनी उसळत राहिला”, असंही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut mocks dcm devendra fadnavis on aurangjeb controversy pmw
Show comments