पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. मात्र, संजय राऊत यांना घेऊन जात असताना संजय राऊत यांच्या आईंचे अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा – ED at Sanjay Raut’s Home Live : “कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले”; संजय राऊतांचा आरोप
दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणत्याही परिस्थिती संजय राऊत यांना येथून जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा – ९ तासांच्या छापेमारीत ईडीने काय केले? संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी नेमके सांगितले, म्हणाले…
संजय राऊत यांनी देखील या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली. “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”, असं ते म्हणाले.