Sanjay Raut : संजय राऊत हे महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशात आता संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवालांचं सरकार आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सूडाचं राजकारण करत आहेत

महाराष्ट्राला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. आम्हीदेखील महाराष्ट्रावर राज्य केलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक मुख्यमंत्री झाले. तसंच राज्याला एक परंपराही आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना हे माहीत नसेल, तर राज्याचं महाभारत त्यांनी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात ही योजना बंद कर, ती योजना बंद कर हे जे सूडाचं राजकारण आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं आहे. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. यांना भीती वाटते आहे की आम्ही हरत आहोत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस लोकांना धमक्या देत आहेत. बाकी त्यांच्या दोन पार्टनरबाबत मला काही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस कपट करत आहेत पडद्यामागून आणि ते महाराष्ट्र पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. नरेंद्र मोदींनीही काँग्रेसच्या चांगल्या योजना नावं बदलून चालवल्या आहेत त्यांनीही नवीन काहीही केलं नाही. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Ajit Pawar
Ajit Pawar On Loan Waiver : अजित पवारांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान; म्हणाले, “माझ्या भाषणात कधी तुम्ही…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Sudhir Mungantiwar News
Sudhir Mungantiwar : “माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला…”; सुधीर मुनगंटीवार यांचा अंगुलीनिर्देश कुणाकडे?
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

देवेंद्र फडणवीसांची झोप उडाली आहे

देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली आहे कारण त्यांचं सरकार जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गाशा गुंडाळावा. महाराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, महाराष्ट्रात जे दळभद्री राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं त्याचा अंत जवळ आला आहे. लोकसभेला मोदी आणि शाह यांनी बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देणार नाही लक्षात ठेवा. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे पण वाचा- Amol Mitkari: अमोल मिटकरी म्हणतात, “संजय राऊत दुतोंडी साप! ते लवकरच…”

भाजपाकडून निवडणूक लांबवली आहे

नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन वन नेशन वन इलेक्शन असं सांगतात. ते चार राज्यांतल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही त्यांना या वल्गना करत आहेत. झारखंड आणि महाराष्ट्रात हरण्याची भीती आहे म्हणून निवडणूक लांबवली आहे. लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता तुम्हाला महिलांना लाच म्हणू द्यायचा आहे त्यासाठीच निवडणूक लांबणीवर पडली आहे असाही आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.

राज्यात तीन घाशीरामांचं राज्य

“महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पेशव्याचं राज्य ज्या पद्धतीने चाललं होतं तसंच आत्ता फडणवीस बोलत आहेत. अनागोंदी, अराजक सगळं चाललं आहे. लूटमार, अराजक याचाच काळ तेव्हा होता. आत्ताही महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल आहेत. घाशीराम कोतवालाचा इतिहास काय ते आम्ही लवकरच महाराष्ट्राला सांगू” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

Story img Loader