Sanjay Raut on CM : राज्यात मतदानानंंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपक्ष आणि इतर लहान पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली असून आपल्या संभाव्य विजयी आमदारांना मुंबईत राहण्याची सोय करण्याकरता हॉटेल्सही बुक केली जात आहेत. दरम्यान, एक्झिट पोल्सननुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता असली तरीही हे फक्त अंदाज आहेत. त्यामुळे योग्य निकाल उद्या २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सरकार कोणाचं स्थापन होणार, यापेक्षाही मुख्यमंत्री कोण होणार? यावरच अधिक चर्चा होत आहे. यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबईतून होणार की दिल्लीत? असा प्रश्न त्यांना आज विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. काँग्रेसचे प्रमुख नेते दिल्लीतून महाराष्ट्रात येतील. त्यांना मँडेट घेऊनच येथे यावं लागेल. शरद पवार मुंबईत असतात, उद्धव ठाकरेही मुंबईतच आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ. नाहीतर भाजपाचे लोक आमच्या हातातील ताट खेचायचा प्रयत्न करतील, एवढे ते निर्घृण लोक आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

आम्ही २६ तारखेला सरकार स्थापन करतोय

संजय राऊत म्हणाले, “लोकसभेला मविआला १० जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला ३१ जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. १६० जागा आम्ही सहज जिंकतोय. हे (एक्झिट पोल) सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल. आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही.

अपक्षांना ५० ते १०० कोटींची ऑफर

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उशाला नोटांची बंडले घेऊन झोपतात. त्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. गादीतही पैसे टाकून ठेवतात. त्यांनी अपक्षांना ५० ते १०० कोटी ऑफर द्यायला सुरुवात केलीय. याचा अर्थ आम्ही जिंकतोय. हे तुमच्या सर्वेवाल्यांना सांगा. त्यांना जिंकण्याची एवढी अपेक्षा असती तर त्यांनी आतापासून थैल्या पाठवल्या नसत्या लहान पक्ष आणि अपक्षांना”, असंही ते म्हणाले,

“मतदानात अचानक वाढ होते, कुठे चार टक्के वाढतात तर हरियाणात सहा टक्के वाढ. लोकसभेलाही मतदानात वाढ झाली. हा खेळ काय आहे, याबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावं. दोन चार टक्क्यांच्या आधारावर भाजपाचा जागा कशा वाढतात? हा खेळ आहे. याबाबत महाराष्ट्राला सांगावं”, असंही ते म्हणाले.

Story img Loader