केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या विरोधात देशातील विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. या ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोचं मुंबईत होणाऱ्या बैठकीत अनावर होणार आहे. याबद्दल खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या लोगोत देशाच्या एकतेचा आणि स्वाभीमानाचा रंग असणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री भगवंत मान, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे नेते ‘इंडिया’च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैभवशाली अशी ही बैठक होणार आहे. त्याचे नियोजन करण्याचं काम चालू आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : “शरद पवारांनी टाकलेली गुगली ही…”, शिंदे गटातील नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

“२०२४ ची लोकसभा निवडणूक ‘इंडिया’ आघाडी जिंकणार आहे. देशाचं संविधान, कायदा आणि लोकतंत्र वाचवण्याची ही लढाई आहे. काही नवीन पक्षही ‘इंडिया’च्या बैठकीत येऊ शकतात.”

हेही वाचा : “आम्ही बसलो, तर सरकार बसेल, आम्ही उठलो, तर…”, बच्चू कडू यांचं विधान

शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जातोय? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “त्यांच्याकडं अजूनही वेळ गोठावण्याची जादू आली नाही. देशात कायदा आणि न्यायालय आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने समजून घेतलं पाहिजं की, आपण कायद्याचे रक्षक आहोत. संविधानानुसार काम न करणाऱ्यांना जनता कचऱ्याप्रमाणे फेकून देते.”

Story img Loader