Sanjay Raut On Dadaji Bhuse : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे अनेकांची धावपळ सुरु आहे. तर काही नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर काही संशयितांनी हल्ला आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आहेत.

सध्या मालेगावमध्ये (Malegaon Assembly Constituency Elections 2024) राजकारण तापलं असून अद्वय हिरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासर दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसेंच्या गुंडांनी हल्ला केला असून ते प्रचाराच्या फेरीत असताना वाहनांवर हल्ला केला”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Supriya Sule On Ajit Pawar
Supriya Sule : “कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन…”, सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
Mohol Constituency Politics
Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

संजय राऊत काय म्हणाले?

“शिवसेना शिंदे गटाचे लोक पराभवाच्या भितीने आमच्या लोकांना धमक्या देत आहेत. आमच्या लोकांवर दबाव आणणं आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरु आहेत. काल संध्याकाळी मालेगाव बाह्यचे आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला. अद्वय हिरे हे प्रचाराच्या फेरीत असताना दादा भुसेंच्या लोकांनी अद्वय हिरेंच्या वाहनांवर हल्ला केला. यावेळी हल्लोखोरांकडे लोखंडी गच, तलवारी, गावठी पिस्तुलं होती. अद्वय हिरेंना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला. आमचे पाच शिवसैनिक यामध्ये जखमी झाले. पोलिसांनी यासंदर्भात अद्यापही ठोस कारवाई केली नाही. हे प्रकरण फक्त मालेगावबाबत मर्यादीत नाही. या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत, असा याचा अर्थ होत आहे. सध्या पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे. काल अद्वय हिरे हे सुदैवाने बचावले आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा’

“अशा प्रकारे या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. मग अशा पद्धतींना निवडणुका होणार आहेत का? मी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आवाहन करतो की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने पदावरून हटवा आणि या गुंडशाही झुंडशाहीच्याबाबत कठोर कारवाईचे आदेश द्या. काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे तुरुंगात असतानाही त्यांच्यावर दबाव आणला जात होता. आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, आम्ही अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाहीत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘दक्षिण सोलापूरचा विषय संपला’

“आमची आताच काँग्रेसच्या नेत्यांनाचर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय संपलेला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात आमचे अधिकृत उमेदवार अमर पाटील हेच असतील. काँग्रेसच्या उमेदवारांना कोणताही एबी फॉर्म दिला जाणार नाही. इतर ठिकाणी काही लोकांनी अर्ज नक्कीच भरले आहेत. मात्र, त्या त्या पक्षाची त्यांना मान्यता नाही. तसेच भूम परांडा या बाबत आमच्यात चर्चा झाली होती. तरीही दोन उमेदवारांनी अर्ज भरले. मात्र, आम्ही त्यामध्ये मार्ग काढू”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader