गेल्या काही दिवसांपासून राज्यात संजय राऊत, किरीट सोमय्या आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चर्चा सुरू आहे. या तिघांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. आधी किरीट सोमय्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांवर आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी त्याला प्रत्युत्तर देणारी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर लगेच नारायण राणेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील घडामोडी वाढल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले. त्यानंतर त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर देखील आरोप केले. तसेच, सोमय्या पिता-पुत्र लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं देखील विधान त्यांनी केलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या आरोपांसंदर्भात त्यांच्याकडे कागदोपत्री पुराव्यांची मागणी केली जात होती. आज संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्याकडे याच घोटाळ्यांसंदर्भात कागदपत्र होती, असं म्हटलं जात आहे.

“त्यांना राष्ट्रवादीकडून सुपारी मिळाली”, या राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचा डोळा…”!

“यावेळी आम्ही कागदपत्रांच्या बाबतीत पक्के”

संजय राऊतांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आरोप फार झाले, त्यावर चौकशी आणि निष्कर्ष निघणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना संजय राऊतांनी त्यावर उत्तर दिलं आहे. “यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडी कागदपत्रांच्या बाबतीत पक्के आणि ठाम आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“बाळासाहेबांनी ‘ती’ गोष्ट मला सांगितली असती, तर आज तुम्ही नसता”, नारायण राणेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र!

मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत काय घडलं?

दरम्यान, यावेळी संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काय घडलं? यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं. “मुख्यमंत्र्यांना मी कालही भेटलो होतो, याआधीही भेटलो होतो. मी त्यांना नेहमीच भेटत असतो. याचा अर्थ आहे वेट अँड वॉच”, असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांचं नेमकं पुढे काय होणार? याची जनतेला उत्सुकता लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on meeting with cm uddhav thackeray allegations on kirit somaiya pmw