महाराष्ट्र दिनी म्हणजेच येत्या १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला गुरुवारी परवानगी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परवानगीवरून बरीच चर्चा सुरू होती. विशेषत: मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी गुरुवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं. या सभेसंदर्भात आज मुंबईमध्ये पत्रकारांनी संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा >> भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; योगी आदित्यनाथांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, “ऐ भोगी काहीतरी…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा