Sanjay Raut on Raj and Uddhav Thackeray : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार) बहुमताहून अधिक जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या आहेत. तर, विरोधकांच्या महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (शरद पवार) १० जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, १२८ जागा लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात एकही जागा जिंकू शकली नाही. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा एकेक आमदार निवडून आला होता. यावेळी त्यांचा विद्यमान आमदारही पराभूत झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संयुक्त शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर केवळ १३ आमदार राहिले होते. दरम्यान, या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचं मोठं नुकसान झालं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा