खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. ही कागदपत्रं राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीसंदर्भातील असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीच्या तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे आज न्यायालयामध्ये राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी ईडीकडून केली जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये १० ठिकाणी जमीन खरेदी केलीय.

नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिल्ल्या माहितीनुसार, संजय राऊतांशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणांवर मंगळवारी केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासामध्ये संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले. या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊत यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय.

नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

नक्की वाचा >> संजय राऊतांना ‘ईडी’कडून अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात…”

राऊत यांच्या अटकेचे समर्थन करताना संचालनालयाचे सहायक संचालक डी. सी. नाहक यांनी रिमांड अर्जात म्हटले आहे की, पत्रा चाळ प्रकल्पात प्रवीण राऊत यांना मिळालेल्या ११२ कोटी तूर्तास एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांना मिळाले हे सकृद्दर्शनी दिसत असले तरी रोख रकमेच्या स्वरूपात राऊत यांना मोठी रक्कम मिळाली आहे.

नक्की वाचा >> “राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

पत्रा चाळ प्रकल्प हा सुरुवातीला मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला म्हाडाने मंजूर केला होता. मात्र या कंपनीत संचालक असलेल्या प्रवीण राऊतने हा प्रकल्प म्हाडाकडून मंजूर होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी संजय राऊत यांनी मदत केली, असा मुख्य आरोप आहे. या कंपनीतील प्रवीण राऊत यांच्या व्यतिरिक्त अन्य संचालकांच्या जागी हौसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि.चे (एचडीआयएल) राजेश व सारंग वाधवान आले. हे सर्व प्रवीण राऊतनेच घडवून आणले. यासाठी पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज उचलण्यात आले.

नक्की वाचा >> विश्लेषण : संजय राऊत गोत्यात आले, ते पत्रा चाळ प्रकरण काय आहे?

हे कर्जही बुडविण्यात आले. पत्रा चाळीच्या प्रकल्पावर नऊ विकासकांकडून ९०१ कोटी रुपये मिळविणे आणि बुडीत पंजाब नॅशनल बँकेकडून कर्जाची उचल या सर्व बाबी घडवून आणण्यात प्रवीण राऊतचा सहभाग होता. या सगळय़ासाठी संजय राऊत यांनी मदत केली. यामध्ये रोखीने कोट्यवधीचा व्यवहार झाला. त्यातूनच अलिबाग येथील भूखंड खरेदी केला गेला. 

Story img Loader