खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. ही कागदपत्रं राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीसंदर्भातील असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीच्या तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे आज न्यायालयामध्ये राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी ईडीकडून केली जाणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये १० ठिकाणी जमीन खरेदी केलीय.
नक्की पाहा >> Photos: ८० लाख, नवनीत राणांचे प्रतिज्ञापत्र, लकडावाला अन् दाऊद; संजय राऊतांच्या अटकेनंतर राणा दाम्पत्य चर्चेत कारण…
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिल्ल्या माहितीनुसार, संजय राऊतांशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणांवर मंगळवारी केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तपासामध्ये संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले. या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊत यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केलाय.
नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत
“तीन कोटी रोख देऊन संजय राऊत यांनी अलिबागमध्ये…”; ईडीचा मोठा खुलासा; छापेमारीत हाती लागली महत्त्वाची कागदपत्रं
आज न्यायालयामध्ये राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी ईडीकडून केली जाणार आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-08-2022 at 07:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut paid rs 3 crores in cash to the sellers for 10 plots of land in alibag ed scsg