शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. हे बंड यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याची टीका केसरकर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले की, “माझं असं मत आहे की, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते असले तरी ते शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे ते असं बोलतात. हे माझं मत आहे. ते खरं आहे की खोटं, हे मला माहीत नाही. ही काही टीका नाहीये, पण ज्याप्रमाणे ते वर्तन करत आहेत. त्यांनी पुढे जाऊन असं वर्तन करून नये.”

हेही वाचा- “संजय राऊतांनी गुंता वाढवला”, बंडखोर आमदार सदा सरवणकर यांची टीका

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आम्ही भाजपा आणि शिवसेनेची युती करून मतं मागायला गेलो होतो. महाराष्ट्रातील जनतेनं आम्हाला ती मतं दिली होती. ती मतं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मताचा सन्मान व्हायला हवा. पण महाविकास आघाडीमुळे पराभूत झालेली लोक सत्तेवर आली. पण आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी दरी निर्माण झाली आहे, ती येत्या काळात भरून निघेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.